कर्जमाफीसाठी शिवसैनिक जिल्हा बँकांसमोर ढोल वाजवणार

कर्जमाफीसाठी शिवसैनिक जिल्हा बँकांसमोर ढोल वाजवणार

शिवसैनिक प्रत्येक बँकेसमोर शेतकऱ्यांना कर्जमाफीबदद्ल माहितीही देणार आहे.

  • Share this:

06 जुलै : शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना आता अभिनव आंदोलन करणार आहे. सोमवारपासून राज्यातील प्रत्येक जिल्हा बँकांसमोर ढोल वाजवणार आहे.  एवढंच नाहीतर शिवसैनिक प्रत्येक बँकेसमोर शेतकऱ्यांना कर्जमाफीबदद्ल माहितीही देणार आहे.

'राज्य सरकारने ३४ लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केलीय. पण अजून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हातात पैसेच आलेले नाहीत. त्यामुळे ज्याप्रकारे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारात बँकेचे अधिकारी वसुलीसाठी येतात. तसंच आता शेतकऱ्यांसाठी शिवसेना कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी बँकेच्या दारात ढोल वाजवणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हा बँकांत सोमवारी सकाळी ११ वाजता, शिवसेना त्या जिल्ह्यातील कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावणार आहे. आणि त्यांना तात्काळ पैसे देऊन कर्जमुक्तं करण्यासाठी बँकेच्या दारातच ढोल वाजवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 05:34 PM IST

ताज्या बातम्या