'कुणी जास्त कोल्हेकुई करू नये', शिवसेनेच्या आढळरावांची अमोल कोल्हेंवर टीका

'कुणी जास्त कोल्हेकुई करू नये', शिवसेनेच्या आढळरावांची अमोल कोल्हेंवर टीका

'कुणी काहीही केलं तरी शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार,' असं खासदार आढळराव पाटलांनी म्हटलं आहे.

  • Share this:

पुणे, 5 मार्च : 'राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदार संघात १५ वर्षापासून उमेदवाराची शोधमोहीम सुरू आहे. कुणी जास्त कोल्हेकुई करू नये,' असं वक्तव्य शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे. आढळराव यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर ही टीका केली आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवत आहे. कोल्हे माळी समाजाचे आहेत. कुणी काहीही केलं तरी शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार,' असं खासदार आढळराव पाटलांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचा शिरूरचा उमेदवार कोण?

अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती याआधीच सूत्रांकडून मिळाली होती. आता अखेर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

Loading...

लोकसभा लढवण्याची शक्यता

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे हे याआधी शिवसेनेत होते. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असला तरी विलास लांडे यांनी मात्र त्यांना चक्क स्टार प्रचारक करून टाकलं आहे. त्यामुळे शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असेल यावरून पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.


VIDEO : पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...