लोकांनी भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं-आढळराव

राज्यसभा हा माझा विषय नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही, असं सांगत या चर्चेलाही आढळराव यांनी पूर्णविराम दिला.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 05:19 PM IST

लोकांनी भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं-आढळराव

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

शिरुर, 26 मे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने सर्वात कमकुवत असलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघात आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दुर्दैवाने मला अपयश आलं आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात घड्याळाचं अजिबात कर्तृत्व दिसलं नाही तर या मतदार संघात लोकांनी प्रचारात जातीचं राजकारण केलं आणि भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं, असं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचं विश्लेषण करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पराभव मान्य असल्याचंही त्यांनी सांगितले. राज्यसभा हा माझा विषय नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही, असं सांगत या चर्चेलाही आढळराव यांनी पूर्णविराम दिला.

पराभवानंतरही शिवाजी आढळराव यांचा मागील 15 वर्षांत नियमित भरणारा जनता दरबार आजही नेहमीप्रमाणे रविवारीच भरला. यावेळी अनेकांनी शिरुर खासदार आढळराव यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी पत्रकार परिषदेत आढळराव यांनी आपला पराभव मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधला.

शिरुर लोकसभा मतदार संघात माझ्या पराभवामुळे मला वाईट वाटलं नाही. तर चौथ्यांदा निवडून आलो असलो तर शिवसेनेला महत्वाचं मंत्रिपद मिळालं असतं. हे मंत्रिपद गेल्यानं तालुक्यातील जनतेला दुःख झालं आहे, असं स्पष्टीकरणही यावेळी आढळराव यांनी दिलं. माझ्या पराभवाच वचपा आंबेगावची जनता नक्की भरून काढेल, असं सांगत थेट राजकीय विरोधक दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. यापुढेही जनता दरबार भरला जाईल, अशी स्पष्टोक्ती आढळराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही तर जनता ठरवेल तो उमेदवार इथून दिला जाईल, पण आपल्या दादाला ज्याने पाडलं त्याचा आंबेगावची जनता समाचार घेईल, असं सांगत दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Loading...


VIDEO : आंबेडकरांची हीच 'ती' खेळी, ज्याने विधानसभेचे दार होणार मोकळे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...