कोल्हापुरात शिवसैनिकांनी केली छुप्या बारची पोलखोल,बारमालकाचीही 'उतरवली'

शिवसैनिकांनी या छुप्या बारची जेव्हा पोलखोल केली तेव्हा बारमालकाच्या नातेवाईक उद्धट बोलू लागला. मग काय शिवसैनिकांनी दिल्या श्रीमुखात भडकावून....हायवेच्या जवळ आणि मंदिरापासून 40 मीटर अंतरावर असलेला हा बार कसा सुरू होता असा शिवसैनिकांचा सवाल आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 15, 2017 09:44 PM IST

कोल्हापुरात शिवसैनिकांनी केली छुप्या बारची पोलखोल,बारमालकाचीही 'उतरवली'

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

15 मे : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरची दारू दुकानं बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं...याची अंमलबजावणी झालीय? असं वाटत असेल तर जर कोल्हापुरात येऊन बघा...कोर्टाच्या आदेशाला धुडकावून राजरोसपणे दारुची विक्री सुरू आहे आणि त्याकडे कुणाचंही लक्ष नाही...

कोल्हापुरातलं हे सिटी क्राऊन हॉटेल... सुप्रीम कोर्टाच्या दारुबंदीनंतरही हायवेवरच्या या हॉटेलात सर्रास दारुविक्री सुरू होती. हे आम्ही नाही म्हणत...हे घ्या पुरावे....या बाटल्या.... हे भरलेले ग्लास.... आणि कॅमेऱ्यांना पाहून तोंड लपवणारे हे ग्राहक... आता एवढं असूनसुद्धा मालक नाकावर माशी बसू देत नव्हता....

बारमध्ये सापडलेला दारुच्या बाटल्यांचा साठा दाखवला. त्यावरही मालकाचं उत्तर तयार... म्हणाला आम्ही कधीतरी पितो म्हणून ठेवतो.

शिवसैनिकांनी या छुप्या बारची जेव्हा पोलखोल केली तेव्हा बारमालकाच्या नातेवाईक उद्धट बोलू लागला. मग काय शिवसैनिकांनी दिल्या श्रीमुखात भडकावून....हायवेच्या जवळ आणि मंदिरापासून 40 मीटर अंतरावर असलेला हा बार कसा सुरू होता असा शिवसैनिकांचा सवाल आहे.

Loading...

सिटी क्राऊनवर कारवाईसाठी पोलीस नेहमीप्रमाणे सगळ्यात शेवटी आले. आणि उत्पादन शुल्कचा अधिकारी तर फिरकलाच नाही. त्यामुळे कोर्टाची हायवेशेजारची दारुबंदी खरंच लागू आहे का? किंवा दारुबंदीच्या अंमलबजावणीसाठी मनापासून प्रयत्न केले जातायेत का असा प्रश्न पडू लागलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2017 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...