News18 Lokmat

पंढरपूर : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह विठ्ठलचरणी, विठ्ठलाला भगवा पोशाख अर्पण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह पंढरपुरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात गेले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 02:22 PM IST

पंढरपूर : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह विठ्ठलचरणी, विठ्ठलाला भगवा पोशाख अर्पण

पंढरपूर, 24 डिसेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह पंढरपुरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात गेले आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते जाहीर सभा घेणार आहेत. राम मंदिर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्यावरून ते भाजविरोधात गजर करणार असल्याचं कळतंय. त्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीप्रमाणेच चंद्रभागेची देखील महाआरती करणार आहेत.

पंढरपुरात शिवसेनेची 'न भुतो न् भविष्यती' अशी महासभा होईल असा दावा, कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केलाय. दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदमांसह शिवसेनेचे पदाधिकारी पंढरपुरात तळ ठोकून आहेत.

शिवसेनेच्या महासभेसाठी पंढरपूर सज्ज झालं असून मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची पावलं पंढरीच्या दिशेनं वळू लागली आहेत. दरम्यान, पंढरपुराला अगदी छावणीचं स्वरुप आलं आहे. संपूर्ण पंढरपूर हे भगवं दिसत आहे. जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त आखण्यात आला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा

- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपूर येथील जाहीर महासभा दुपारी ३ वाजता सुरू होईल. सुरुवातीला वारकरी संप्रदयातील मान्यवर महाराजांचं निरुपण होईल.

Loading...

- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे चंद्ररभागा मैदानातील महासभा स्टेजवर संध्याकाळी ४:३० येतील.

- उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी ४:४५ वाजता मुंबई ते पंढरपूर अशी 'विठाई' एस टी बस सेवेचा शुभारंभ होणार आहे.

- त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे भाषण संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल.

- शिवसेना पंढरपूर महासभा संध्याकाळी ६ वाजता संपेल.

- उद्धव ठाकरे कुटुंबासह पुन्हा शासकिय निवास्थानी येतील.

- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह संध्याकाळी ६:४५ वाजता चंद्रभागा किनारी इस्कॉन घाटावर महाआरतीसाठी पोहचतील


VIDEO: अमितच्या लग्नाला मोदींना बोलवणार का? राज ठाकरे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...