मराठा आरक्षण : कशी राहील शिवसेनेची भूमीका? पक्षप्रमुखांनी बोलवली बैठक

मराठा आरक्षण : कशी राहील शिवसेनेची भूमीका? पक्षप्रमुखांनी बोलवली बैठक

आरक्षण हे आर्थिक निकषांवरच असायला हवं, तेव्हाच कुठे त्याचा लाभ सामान्य गरजुंना होईल अशी भूमीका शिवसेनेची नेहमी राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 28 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (सोमवारी) दुपारी १२ वाजता मातोश्रीवर सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करण्यात येणार आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच असायला हवं, तेव्हाच कुठे त्याचा लाभ सामान्य गरजुंना होईल अशी भूमीका शिवसेनेची नेहमी राहिली आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठीचं आंदोलन आता राज्यात चांगलच पेटलं आहे. या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका सार्वजनिक केलेली नाही. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कायम जातीवर आधारित आरक्षणाचा विरोध केला होता.

एका महिन्यात मागास आयोगाचा अहवाल येईल- देवेंद्र फडणवीस

आरक्षण हे आर्थिक निकषांवरच असायला हवं, तेव्हाच कुठे त्याचा लाभ सामान्य गरजुंना होईल अशी भूमीका शिवसेनेची नेहमी राहिली आहे. मराठा आरक्षण या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी बोलणे टाळले असले तरी, शिवसेना मराठा आरक्षण आणि एट्रोसिटी कायद्यात संशोधन व्हायला हवे अशी भूमीका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. आर्थिक निकषांवर नसलं तरी, मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं की नको या कळीच्या ठरलेल्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी १२ वाजता मातोश्रीवर सर्व एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीला त्यांनी सर्व आमदारांना आमंत्रित केले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आसल्याची माहिती आहे.

हेही वाचा...

चक्क पशु वैद्यकीय दवाखान्यात दारू आणि मटणाची पार्टी

८ लोकांनी गरोदर बकरीवर केला सामुहिक बलात्कार

'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 05:33 PM IST

ताज्या बातम्या