राजकीय युतीसोबतच झाली 'कौटुंबीक युती', भाजप-शिवसेनेचे हे नेते बनले व्याही

अभिषेक पाण्डेय, (प्रतिनिधी)- भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. या राजकीय भाजपचे मंत्री आणि शिवसेनेचे आमदार हे व्याही झाले आहेत.

  • Share this:

भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. या राजकीय भाजपचे मंत्री आणि शिवसेनेचे आमदार हे व्याही झाले आहेत.

राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे दोन्ही नेत्यांमध्ये नवं नातं जुळले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या मुलगा पूर्वेश यांचा विवाह रणजित पाटील यांची कन्या कश्मीरासोबत नुकताच धूमधडाक्यात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या लग्नाला सहकुटुंब हजेरी लावली होती.

हाय प्रोफाइल विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार, आमदार, वरिष्ठ शासकीय अधिकारी, सिनेस्टार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचा विजयी जल्लोष देखील साजरा करण्यात आला.

सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी बाब म्हणजे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विवाह सोहळ्याला पोहोचले होते. राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीने महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला मात्र एक तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: May 26, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या