नीलम गोऱ्हेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिली, मात्र हे मानाचं पद मिळालं

'नीलम ताईंसारख्या अभ्यासू आमदार या पदावर येत असल्याचा आनंद आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.'

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 06:00 PM IST

नीलम गोऱ्हेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिली, मात्र हे मानाचं पद मिळालं

मुंबई 24 जून : शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि अभ्यासू आमदार नीलम गोऱ्हे यांची आज विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बिनविरोध निवड झाली. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्याच महिला नेत्या आहेत. नीलम गोऱ्हे यांचं नाव कायम मंत्रिपदासाठी घेतलं जातं. मात्र त्यांना कायम या पदाने हुलकावणी दिलीय. मात्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर त्यांची निवड झाल्याने अनेक सदस्यांनी समाधान व्यक्त केलं. मंत्री दिवाकर रावते यांनी नीलमताईंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर सुभाष देसाई, महादेव जानकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्याला अनुमोदन दिलं.

काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे यांनी रिपाई नेते जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र संख्या बळाचं गणित जमत नसल्याने त्यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेत असल्याचं रणपीसे यांनी सांगितलं. तर निवडणुकीमुळे कटूता येऊ नये असं वाटल्याने उमेदवारी मागे घेत असल्याचं कवाडे म्हणाले. गोऱ्हे यांनी फुले, आंबेडकरांच्या विचारांवर काम करावं, सेनेचा पुरोगामी चेहरा म्हणजे निलम गोऱ्हे आहेत. पहिल्यांदा महिला प्रतिनिधी उपसभापतीपदावर येत असल्याचा आनंदर आहे अशी भावनाही कवाडे यांनी व्यक्त केली.

तर नीलम ताईंसारख्या अभ्यासू आमदार या पदावर येत असल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा सभागृहाला फायदा होऊल असंही ते म्हणाले.

विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विरोध पक्षनेत्याच्या आसनाजवळ जाऊन बसवलं आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंत सर्व नेत्यांनी वडेट्टीवारांना शुभेच्छा देणारी भाषणं केलीत. शेवटी वडेट्टीवारांनीही सर्वांचे आभार मानले. या सर्वांच्या भाषणात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा सर्वांनी आवर्जुन उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करण्यासाठी त्याचा वापर केला. वडेट्टीवारांनी तर विरोधी पक्षनेतेपदावर काम करताना तुमची मदत लागेल अशी गळच त्यांना घातली आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला दाद दिली.

Loading...

विजय वडेट्टीवार म्हणाले,आदिवासी भागातून मी माझ्या कारकीर्दीची सुरुवात केली. मी उपेक्षित, दुर्लक्षित माणसाला पुढे आणण्यासाठी अविरत काम केलं. मी शिवसेनेत काम केलं नसतं तर मी आज या ठिकाणी आलो नसतो. मी सत्ताधाऱ्यांकडे जनतेच्या हिताची कामं घेऊन गेलो, वैयक्तिक काम कधीही नेली नाहीत. विरोधी पक्षनेते असताना खडसेंचं भाषण आम्ही बाहेर असेल तर धावत जाऊन ऐकायचो, नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाची मला अत्यंत आवश्यकता आहे. थेट मार्गदर्शन करता येत नसेल तर त्यांनी अदृश्य रुपात मार्गदर्शन करावं अशी कोपरखळीही त्यांनी मारली त्याला विरोधीपक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही हासून दाद दिली.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना सरकारची पळता भुई थोडी व्हायची, टी ट्वेंटीची मॅच खेळताना एकटं खेळून चालत नाही चांगली टीम लागते असं त्यांना अजित वारांना सांगितलं. ज्याला महत्त्वाकांक्षा नाहीये तो राजकारणात राहू शकत नाही. सीएम साहेब तुम्हाला  दिल्लीत पाहायचंय असंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...