मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा, संजय राऊत म्हणाले...

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा, संजय राऊत म्हणाले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलं, असे सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे.

  • Share this:

बब्बू शेख, (प्रतिनिधी)

मनमाड, 19 जुलै- महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी मनमाडला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचाच नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असे ठामपणे सांगून खळबळ उडवून दिली.

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहे. एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदावर आमचाच माणूस बसेल, असे सांगत आहे तर दुसरीकडे शिवसेना देखील मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगत आहे. तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलं, असे सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे. त्यामुळे अखेर सेना-भाजपचे ठरलं तरी काय, अशी चर्चा संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा सुरू झाली आहे.

युवा सेनेने काढलेली जनआशीर्वाद यात्रा मनमाड शहरात आल्यानंतर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला युवा नेता मिळाला असून सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे आशेने पाहून महाराष्ट्राचे नेतृत्त्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे सांगत एका प्रकारे आगामी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केल्याचे दिसून आले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली जनआशीर्वाद यात्रा मनमाडला येताच तिचे ढोल ताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ, मनमाडचा पाणी प्रश्न यासह विविध मुद्द्यांना हात घालत सर्व प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

SPECIAL REPORT : औरंगाबादेत 'जय श्रीराम'च्या घोषणेसाठी तरुणाला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 09:23 PM IST

ताज्या बातम्या