Elec-widget

राष्ट्रवादीचे बांदल, मोहिते, मुळातच गुंड प्रवृत्तीचे, माझा कोणताही हात नाही- शिवाजी आढळराव

राष्ट्रवादीचे बांदल, मोहिते, मुळातच गुंड प्रवृत्तीचे, माझा कोणताही हात नाही- शिवाजी आढळराव

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते यापैकी एक खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण दंगलीचे आरोप आहेत तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • Share this:

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

शिरुर, 21 जुलै- पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते यापैकी एक खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण दंगलीचे आरोप आहेत तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, दोघेही शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्या यांच्या सांगण्यावरून पोलीस हे करत आहेत, असा आरोप करत आहेत. याबाबत रविवारी शिवाजी आढळराव यांनी या दोन्ही नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे या दोन्ही नेत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याला लोकसभेतील आढळरावांचा पराभव झाल्याने हे गुन्हे दाखल झाल्याची आगपाखड दोघांकडून केली जात असल्याने ते सांगत आहेत. यावर आढळराव यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला.

काय म्हणाले आढळराव?

म्हणाले की, या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. मंगलदास बांदल हा जमिनीच्या व्यवहारात लोकांना ठगतो, लोकांना फसवणे, खंडणी मागणे, कंपनी मालकांना त्रास देणे, डान्स बार चालवणे किंवा लोकांना धमकावणे अशा प्रकारची त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. 300 ते 400 कुटुंबाची जमीन व्यवहारात फसवणूक करण्यात आली आहे. बांदलची गुन्हेगार पार्श्वभूमी असताना तो माझे नाव का घेतो? असा सवालही आढळराव यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading...

दिलीप मोहिते जर राजकारणात आला नसता तर एक अट्टल गुन्हेगार दंगलखोर अशा स्वरूपाचा माणूस म्हणून उदयास आला असता, असे सांगत मोहितेची चाकण दंगल प्रकरणात विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. चाकण शहराचे वातावरण बिघडवणे आणि मराठी मोर्चाला बदनाम करायचे काम त्यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी चालू आहे, असे असताना 15 वर्षांत अशा स्वरूपाचे कोणतेही आरोप मी त्यांच्यावर केले नाहीत. पोलिसांनी पकडले की, आढळरावने हे केले, असे ते म्हणतात, हे कुठं तरी थांबवा, असे आवाहन आढळराव यांनी यावेळी केले आहे.

VIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2019 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...