ऑडिओ क्लिपमधल्या भाषेवरून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेची मागणी

पालघर पोट निवडणुकीचा प्रचार आता संपलां आहे. प्रचार संपत असतानाच शिवसेनेनं पत्रकार परीषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 26, 2018 06:33 PM IST

ऑडिओ क्लिपमधल्या भाषेवरून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेची मागणी

26 मे : पालघर पोट निवडणुकीचा प्रचार आता संपलां आहे. प्रचार संपत असतानाच शिवसेनेनं पत्रकार परीषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑडियो क्लिपमधील साम, दाम, दंड, भेद ही भाषा जाहीर झाल्यावर आता महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी शिवसेनेनं पत्रकार परीषद घेऊन केली आहे.

पालघर पोटनिवडणुकीच्यो तोंडावर शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या खुलाश्यानंतर आम्ही जी काही ऑडियो क्लिप काल दाखवली त्याची शहानिशा आजच व्हायला पाहिजे. असं शिवसेनं म्हटलं आहे.

जे काही फॉरेन्सिक तज्ञ असतील त्यांनी इतर सर्व राजकिय पक्षांच्या समोर शहानिशा करावी. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की ऑडियो क्लिपमध्ये काही ही आक्षेपार्ह नाही. मग ते खुलासे का करतायेत. भाजप सांगतंय की आम्ही ४ वर्षात विकास केला तर मग साम दाम दंड भेदची भाषा का वापरत आहेत. अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

जर क्लिपमध्ये छेड छाड असेल तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत. नाही तर आता मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही. असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2018 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...