News18 Lokmat

शिवसेना सोबत राहावी ही भाजपची इच्छा – अमित शहा

महाराष्ट्रात आणि एनडीएत शिवसेना ही भाजपसोबतच राहावी अशी आमची इच्छा असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज स्पष्ट केलं. भाजपचा जंगी महामेळावा झाल्यावर शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे वक्तव्य केलं.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2018 05:20 PM IST

शिवसेना सोबत राहावी ही भाजपची इच्छा – अमित शहा

मुंबई,ता.06 एप्रिल : महाराष्ट्रात आणि एनडीएत शिवसेना ही भाजपसोबतच राहावी अशी आमची इच्छा असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज स्पष्ट केलं. भाजपचा जंगी महामेळावा झाल्यावर शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे वक्तव्य केलं. विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकाच वेळी होणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावर देशभर चर्चा सुरू झाली होती.

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भाजपच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी भाजपची विजयी घौडदौड सुरूच राहिल असही ते म्हणाले. राममंदीराचा मुद्दा हा निवडणूकीचा मुद्दा नाही तो आस्थेचा मुद्दा आहे त्यामुळं तो विषय भाजपच्या अजेंड्यात राहणारच असही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोबत होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...