बर्थ डे पार्टीत शिवसैनिकाची तिक्ष्ण शस्त्राने हत्या, मित्रांनीच केले सपासप वार

बर्थ डे पार्टीत शिवसैनिकाची तिक्ष्ण शस्त्राने हत्या, मित्रांनीच केले सपासप वार

वाढदिवसाची पार्टी सुरू असताना झालेल्या क्षुल्लक कारणावरून शिवसैनिकाची तिक्ष्ण शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) मध्यरात्री साईबाबा गार्डन येथे घडली.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै- वाढदिवसाची पार्टी सुरू असताना झालेल्या क्षुल्लक कारणावरून शिवसैनिकाची तिक्ष्ण शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.  ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) मध्यरात्री साईबाबा गार्डन येथे घडली. नितेश सावंत उर्फ बंटी (वय-27 ) असे मृत तरूणाचे नाव आहे. बंटी ही शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रदीप सावंत यांचा पुतण्या होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घाटकोपरमधील नितेश सावंत याचा शनिवारी (27 जुलै) वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी त्याला रविवारी रात्री उशिरा साईबाबा गार्डन येथे बोलवले. त्यावेळी जुन्या वादाचा विषय निघाला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चिडलेल्या 7 ते 8 जणांनी नितेश याची तिक्ष्ण शस्त्राने निर्घृण हत्या केली. यानंतर घटनास्थळी पंतनगर पोलीस दाखल झाले आणि नितेशला जखमी अवस्थेत नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे घाटकोपरसह परिसरात खळबळ उडाली आहे. पंतनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे. एका आठवड्यापूर्वी नितेश आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले होते. याच वादातून हा खून झाल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Mumbai: 27-year-old man killed by 7-8 people during his birthday celebrations last night in Ghatkopar. Police Inspector Pratap Bhosle says, &quot;prima facie, the deceased had an altercation with some people 4 to 5 days ago, &amp; he was killed in connection with that&quot;. <a href="https://twitter.com/hashtag/Maharashtra?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Maharashtra</a> <a href="https://t.co/hrMPO44PNX">pic.twitter.com/hrMPO44PNX</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1155629398831312897?ref_src=twsrc%5Etfw">July 29, 2019</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या