साईच्या दरबारातील प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

राजेंद्र जगताप हे नेहमीच असभ्य वर्तन करतात असा आरोप पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2018 05:32 PM IST

साईच्या दरबारातील प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

हरीष दिमोटे, प्रतिनिधी


शिर्डी, 16 नोव्हेंबर : शिर्डी साईबाबा मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप यांच्यावर एका स्थानिक प्रतिष्ठित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून जगताप यांच्या निलंबनाची मागणी या पीडित महिलेने केली आहे.


साईबाबांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान मंदिरात उभे असताना मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांनी मला आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांचे हात ओढत असभ्य वर्तन केले आणि ढकलून दिले. राजेंद्र जगताप हे नेहमीच असभ्य वर्तन करतात असा आरोप पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

Loading...


आम्ही दर गुरुवारी पालखीला जात असतो, आम्हाला सात ते आठ वर्ष झाली आहे. पण नेहमी तिथे छेडछाडाची प्रकार घडतात. आम्ही बाबाची श्रद्धा सबुरी म्हणून दुर्लक्ष केलं. बाबांच्या शिकवणीनुसार आम्ही पुढे जात होतो. पण काल हद्द झाली. पालखी द्वारकामाई येथून गाभाऱ्यात आली. आम्हाला बाजूला उभं राहण्यास सांगितलं. आम्ही बाजूला उभे राहिलो. तेव्हा राजेंद्र जगताप याने तिथे येऊन माझा हात ओढला. माझ्या जावेचा मुद्दामहुन हात ओढून दूरपर्यंत नेले. हा जगताप महिलांच्या साडीचे पदर ओढतो. जगताप याने साईभक्तांना त्रास दिलाच नाही तर गावातील लोकांनीही त्रास दिला असं या पीडित महिलेनं सांगितलं.


राजेंद्र जगताप हे गेल्या २५ वर्षांपासून साईबाबा संस्थानमध्ये नोकरी करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते मंदिर प्रभारी आहेत. संस्थानच्या कामगार सोसायटीचे ते ८ वर्ष चेअरमन देखील राहिले आहेत. त्यांच्यावर महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जगताप यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे.


शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भादवी कलम 354 , 323 , 504 , 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या राजेंद्र जगताप फरार आहेत.


=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...