शिर्डी लोकसभा निवडणूक : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामना

या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरच मदार ठेवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र भाऊसाहेब कांबळेंना तिकीट दिलं. शिर्डी लोकसभेची जागा 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेने जिंकली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 03:28 PM IST

शिर्डी लोकसभा निवडणूक : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामना

शिर्डी, 18 मे : या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरच मदार ठेवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र भाऊसाहेब कांबळेंना तिकीट दिलं. वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान हेही इथे रिंगणात होते.

शिर्डी लोकसभेची जागा 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेनेच जिंकली आहे. यावेळी ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव होती.

1952 ते 2008 या काळात शिर्डी हा कोपरगाव मतदारसंघाचाच एक भाग होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंर 2009 मध्ये इथे निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे जिंकून आले तर 2014 च्या निवडणुकीत सेनेचे सदाशिव लोखंडे यांचा विजय झाला.

2 वेळा सेनेची बाजी

शिर्डी लोकसभा मतदारंसघातल्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा आहे पण याआधीच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र शिवसेनेने बाजी मारली. शिर्डीमध्ये विजयाची हॅटट्रिक करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. इथे 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झालं. त्यात 63. 20 टक्के मतदानाची नोंद झाली.

Loading...

मागच्या निवडणुकीत लोखंडेंचा विजय

मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांचा विजय झाला. त्यांना 5 लाख 32 हजार 936 मतं मिळाली तर काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांना 3 लाख 33 हजार 14 मतं मिळाली.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये

भाऊसाहेब वाकचौरे हे 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढून संसदेत गेले होते पण त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2014 ची निवडणूक ते हरले. या मतदारसंघात अगदी कमी म्हणजे 11 हजार 580 मतं मिळवून आप तिसऱ्या स्थानावर होती.

रामदास आठवले राज्यसभेत

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हेही 2009 च्या निवडणुकीत शिर्डीतून निवडणूक लढले पण त्यांचा पराभव झाला. यानंतर ते भाजप शिवसेना युतीमध्ये गेले आणि राज्यसभेचं सदस्यस्व घेऊन मोदी सरकारमध्ये मंत्री झाले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोपरगाव आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचा ताबा आहे. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. संगमनेर, शिर्जी, श्रीरामपूर हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.

==============================================================================

VIDEO: मोदींच्या पत्रकार परिषदेबाबत राज ठाकरे म्हणतात, 'यासारखं दुर्दैवं नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...