...आणि लग्नपत्रिकेमध्ये सुजय विखे झाले खासदार

...आणि लग्नपत्रिकेमध्ये सुजय विखे झाले खासदार

सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर नगरची ही जागा प्रतिष्ठेची झाली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश करून आघाडीसमोर आव्हान उभं केलं.

  • Share this:

शिर्डी, 03 मे : लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात मतदान पूर्ण झाल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. 23 मे रोजी देशातील निवडणूक निकाल लागणार आहे. पण त्याआधीच  भाजपचे उमेदवार सुजय विखे हे खासदार झाले आहेत. एका लग्नपत्रिकेतून त्यांची खासदारकी घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक गाजलेल्या अहमदनगर इथे सुजय विखेच खासदार होणार, असा आत्मविश्वास असणाऱ्या कार्यकर्त्याने आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून सुजय विखेंच्या नावापुढे खासदार म्हणून उल्लेख केला आहे. या लग्नपत्रिकेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: ..तर मनसेचं 'इंजिन' 'घड्याळा'च्या काट्यावर धावणार!

सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर नगरची ही जागा प्रतिष्ठेची झाली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश करून आघाडीसमोर आव्हान उभं केलं. निवडणूक प्रचारही त्याच पद्धतीने जोरदार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार आणि इतर दिग्गज नेत्यांच्या सभा नगरमध्ये झाल्या.


विखे पाटील विरूद्ध पवार असाच संघर्ष नगरच्या निवडणुकीत रंगला होता. आता नगरचा खासदार कोण होणार यावरच चर्चा सुरू असताना या कार्यकर्त्याने मुलीच्या लग्नात प्रमुख पाहुणे म्हणून सुजय विखेंच्या नावापुढे थेट खासदार म्हणून उल्लेख केला आहे. यावर उत्तर देताना सुजयदादाच खासदार होणार असल्यानं आपण अशा प्रकारे नाव छापल्याचं कार्यकत्याने म्हटलं आहे.


VIDEO: काही वेळात धडकणार फानी चक्रीवादळ, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 06:48 AM IST

ताज्या बातम्या