News18 Lokmat

दिल्लीहून येणारे विमान घसरले, शिर्डी विमानतळावरील घटना

शिर्डी विमानतळावर स्पाईस जेटचे विमान घसरल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 08:14 PM IST

दिल्लीहून येणारे विमान घसरले, शिर्डी विमानतळावरील घटना

शिर्डी, 29 एप्रिल: शिर्डी विमानतळावर स्पाईस जेटचे विमान घसरल्याची घटना घडली आहे. दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे समजते. दरम्यान या घटनेनंतर धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.Loading...

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी विमानतळाची धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.दिल्लीहून स्पाईस जेटचे विमान क्रमांक SG946 शिर्डी विमानतळावर उतरताना घसरले. यात कोणीही जखमी झाले नाही.काय झाले नेमके

दिल्लीहून शिर्डीला आलेल्या स्पाईस जेटचे विमान धावपट्टी सोडून खाली उतरले. विमानाची चाके मातीत रोवली गेली. जेव्हा विमान धावपट्टी सोडून खाली उतरले तेव्हा मोठा आवाज झाला आणि मातीचा धुराडा उडाला. या घटनेनंतर विमानतळावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लगेच धाव घेतली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. या घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.


VIDEO: मुंबईत हेमा मालिनी यांनी केलं मतदान, मथुरेत आजमावणार नशीब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...