S M L

शिर्डी 2011 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 12 दोषींना जन्मठेप, 1 कोटींचा दंड

यातील १० लाख रूपये मृतांच्या वारसांना देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

Sachin Salve | Updated On: May 3, 2018 11:45 PM IST

शिर्डी 2011 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 12 दोषींना जन्मठेप, 1 कोटींचा दंड

03 मे : शिर्डीत २०११ साली झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी १२ आरोपींना नाशिकच्या विशेष मोक्का कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. यात शिर्डीतील कुख्यात गुंड पाप्या शेखचाही समावेश असून कोर्टाने सर्व आरोपींना तब्बल १ कोटी ३२ लाखांचा दंडही सुनावलाय. यातील १० लाख रूपये मृतांच्या वारसांना देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

१४ जून २०११ ला शिर्डीतील प्रवीण गोंदकर आणि रचित पाटणी या दोघा युवकांचं अपहरण करून खंडणीसाठी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्येआधी या दोघा युवकांसोबत अनैसर्गिक कृत्यही करण्यात आलं होतं. त्यानंतर शिर्डीजवळच्या एका शेतात त्यांचे नग्न अवस्थेतील मृतदेह फेकून देण्यात आले होते. या गुन्ह्यात कुख्यात गुंड पाप्या शेखसह २४ संशयितांचा समावेश होता. त्याच्या दहशतीमुळे संशयिताविरोधात साक्ष देण्यासाठी साक्षीदार पुढे येत नव्हते.

त्यामुळे काही साक्षीदारांना पोलिस संरक्षण तर काही साक्षीदारांच्या साक्ष या पडदा ठेऊन नोंदवण्यात आल्या होत्या. गुंड पाप्या शेखच्या दहशतीमुळे गेल्या ६ वर्षांपासून हा खटला नाशिकच्या विशेष मोक्का कोर्टात चालवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2018 11:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close