शिर्डी विमानतळाचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

आता यापुढे शिर्डी -मुंबई प्रवास फक्त 40 मिनिटात करता येणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2017 12:35 PM IST

शिर्डी विमानतळाचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण

शिर्डी,01 ऑक्टोबर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. आता यापुढे शिर्डी -मुंबई प्रवास फक्त 40 मिनिटात करता येणार आहे.

आज सकाळी राष्ट्रपती येणार म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने मंदिर 9 ते 11 या वेळेत बंद ठेवलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं आहे. विमानतळाचं लोकार्पण झाल्यानंतर आ राष्ट्रपती शिर्डीत गेले. शिर्डीमध्ये साईबाबा समाधी शताब्दी वर्ष साजरं होतंय. त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शताब्दी वर्षे झेंड्याचं आज अनावरण करण्यात आलं . या झेंड्याचं डिझाईन प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारलं . या झेंड्याचं अनावरण झालं त्यावेळी मुख्यमंत्रीही तिथे उपस्थित होते. अनावरण केल्यानंतर राष्ट्रपतींनी लोकांना संबोधित केलं आहे. शिर्डीच्या कणाकणात साईबाबा राहत असल्याचं ते आपल्या भाषणात म्हणाले. तसंच साईबाबांच्या शिकवणीची त्यांनी यावेळी आठवण करून दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...