शेगाव तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्यास सहाय्यक निबंधकाचा नकार

शेगाव तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्यास सहाय्यक निबंधकाचा नकार

घोटाळेबाज संचालकांकडू माझ्या नातेवाईकांच्या जीवितास धोका असल्याचा निबंधकांचा गंभीर आरोप

  • Share this:

27 मे : शेगाव तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्यास सहाय्यक निबंधकाचा नकार दिला आहे. आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाला धोका असल्याचं कारण देत त्याने चौकशी करण्यास नकार दिला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी या सहाय्यक निबंधकावर होती. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव नांदुरासह अनेक तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदीत घोटाळा झाला होता. याच प्रकरणावर IBN लोकमतने वेळोवेळी बातमीही केली होती.

शेगाव इथल्या तूर खरेदी घोटाळ्यात बाजार समिती संचालकांनी स्वत: शेकडो क्विंटल तूर विकल्याचे समोर आलं होतं. याच प्रकरणाच्या सखोल चौकशीचे या सहाय्यक निबंधकांना देण्यात आले होते. पण आपल्या जिविताला धोका असल्याचं सांगत या चौकशीला नकार दिल्यामुळे या प्रकरणाचा वेगळं वळण लागलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2017 03:38 PM IST

ताज्या बातम्या