S M L

वादग्रस्त शार्पशूटरकडे 'त्या' वाघिणीला मारण्याची सुपारी, पण...!

कोण आहे शिकारी शाफत अली खान?

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2018 10:12 PM IST

वादग्रस्त शार्पशूटरकडे 'त्या' वाघिणीला मारण्याची सुपारी, पण...!

यवतमाळ, 14 सप्टेंबर : यवतमाळच्या जंगलातील कथित नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे शक्य झाले नाही तर बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार मारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेत. पण वाघिणीला मारण्यासाठी वनविभागानं वादग्रस्त शिकारी शाफत अली खानला पाचारण केल्यानं नवा वाद निर्माण झालाय.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि राळेगावच्या जंगलात 13 जणांचा जीव घेणाऱ्या वाघिणीच्या मागावर शाफत अली खान नावाचा मृत्यू आहे. होय...शाफत अली खान. तब्बल 500 प्राण्यांच्या शिकारींचं शौर्य मिरवणाऱ्या नवाब शाफत अलीच्या बंदुकीतील गोळीवर टी- 1 वाघिणीचाही मृत्यू लिहिला गेलाय. वाघिणीला ठार मारण्याच्या वनविभागाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर उमटल्यानं तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं जातंय. पण वाघिणीला मारण्याची सुपारी शाफत अली खानला दिली गेल्यानं नवा वाद निर्माण झालाय.

देशातला हाय प्रोफाईल शिकारी शाफत अली खानवर या आधीही अत्यंत गंभीर आरोप झालेत. माओवाद्यांना शस्त्र पुरवठा केल्याच्या प्रकरणात अटक झालेल्या शिकारी शाफत अली खानला वनविभागानं पाचारण केल्यानं नक्षलविरोधी कार्यकर्त्यांनी वनविभागावर आरोपांच्या फैरी झाडल्यात.कोण आहे शिकारी शाफत अली खान?

- देशभरात पाचशेहून अधिक वन्यजीवांची शिकार केल्याची त्याच्या नावावर नोंद

- 1991 -92 मध्ये माओवाद्यांना शस्त्र पुरविल्याच्या आरोपावरून शाफत अली खानला अटक

Loading...

- 2005 मध्ये कर्नाटक वनविभागाच्याकडून अवैध शिकारीच्या प्रकरणात शाफत अटकेत

- बोर अभयारण्यातील वाघिणीला मारण्यासाठीही वनविभागाकडून शाफत अलीला पाचारण

- नवाब शाफत अली खान देशविदेशात वादग्रस्त शिकारी म्हणून प्रसिद्ध

- एका शिकारीसाठी नवाब शाफत अलीला वनविभागाकडून लाखोंचा मलिदा

दरम्यान, आठ वर्ष वयाच्या कथित नरभक्षक टी 1 या वाघिणीचे दोन वर्षांचे दोन बछडे आहेत. जर या वाघिणीला गोळ्या घालून ठार केलं तर हे दोन बछडेही नरभक्षक बनतील असा वन्यप्रेमींचा दावा आहे.

 

VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्विमिंग कोच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 02:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close