News18 Lokmat

विखेंच्या मुलाचा हट्ट मी कसा पुरवणार - शरद पवार

पवारांच्या या टिप्पणीवरून त्यांनी नेमकं काय राजकारण झालंय यावरही भाष्य केलंय. त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले.

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 08:08 PM IST

विखेंच्या मुलाचा हट्ट मी  कसा पुरवणार - शरद पवार

मुंबई12 मार्च  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरून टोला लगावला आहे. पवार म्हणाले, माझ्या घरातल्या मुलाचा हट्ट मी पुरवला. मात्र विखेंच्या मुलाचा हट्ट मी कसा पुरवणार? तो हट्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्यांच्या वडिलांची आहे. पवारांच्या या टिप्पणीवरून त्यांनी नेमकं काय राजकारण झालंय यावरही भाष्य केलंय. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नगरच्या जागेसाठी सुजय हे आग्रही होते. मात्र ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने ती त्यांनी काँग्रेससाठी सोडली नव्हती. पवार आणि विखे यांचं राजकारणात जुणं भांडण आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न करूनही राष्ट्रवादीने ती जागा सोडली नाही. पवारांनी नगरची जागा न सोडून एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातं. एक म्हणजे त्यांनी विखेंचा हिशेब चुकता केला तर विरोधीपक्ष नेत्याचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला धक्का बसला.

आणखी काय म्हणाले पवार?

माझ्या घरातला मुलाने हट्ट केला तो मी पुरवणार, मात्र विखेंच्या मुलाचा कसा पुरवणार. सुजय विखे हे काही राज्य पातळीवरचं नेतृत्व नाही, त्यांचा हट्ट पुरवण्याची जबाबदारी ही त्यांच्या वडिलांची आहे. मी हट्ट पुरवला असता तर विखेंना काय वाटलं असतं. मुलाचा हट्ट इरांनी का पुरवावा.

बुधवारी भाजप विरोधी सगळे पक्ष दिल्लीत एकत्र येणार आहेत, त्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. 14 तारखेला केंद्रातील  सर्व घटक पक्ष निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत.

Loading...

प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत कधीच नव्हते. शेतकरी संघटने बरोबर चर्चा झाली  आहे मार्ग निघेल.

VIDEO : सासरे काँग्रेसमध्ये आणि पती भाजपात, पाठिंबा कुणाला? सुजय यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...