30 डिसेंबर : शरद पवारांचं नाही म्हणजे हो असतं का? हा प्रश्न आज दिवसभर राजकीय वर्तुळाच चर्चिला जाईल आणि त्यामागचं कारण म्हणजे सुशीलकुमार शिंदेंनी पवारांच्या राजकीय भविष्यासंदर्भात त्यांच्याच देखत केलेलं वक्तव्य.
राजकीय क्षेत्रात पन्नास वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. प्रतिभाताईंच्या कारकीर्दीवर आधारित भारताची प्रतिभा या पुस्तकाचं अनावरण पुण्यात शरद पवारांच्या हस्ते झालंय. या कार्यक्रमात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच व्य़ासपीठावर आले होते. डॉ. रघुनाथ माशेलकर, पृथ्वीराज चव्हाण हेही यावेळेस उपस्थित आहेत.
खरं तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव प्रणव मुखर्जी उपस्थित राहू शकले नाही. आणि हीच संधी साधत मिश्किल स्वभावाच्या सुशील कुमार शिंदेंनी, प्रणव मुखर्जी हे माजी राष्ट्रपती आज येऊ शकले नाही, पण देशाचे भावी राष्ट्रपती शरद पवार आज इथं आले आहे असं म्हणत पवार हे देशाचे भावी राष्ट्रपती असल्याचं भाकीत केलं. मात्र शरद पवारांनी हाताने हालवून नकार दिला. पण सुशीलकुमार शिंदेंनी,"पवारसाहेबांना हातांनी जरा नकार दिला तरी त्याचा होकार असाच अर्थ असतो" असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा