शरद पवार vs हर्षवर्धन पाटील, या जागेवरून काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं

विधानसभेला तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडेल, या आशेवर हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना मोठं लीड मिळवून दिलंय. पण तरीही शरद पवारांनी त्याच हर्षवर्धन पाटलांना अजूनही गॅसवर ठेवणंच पसंत केलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 05:11 PM IST

शरद पवार vs हर्षवर्धन पाटील, या जागेवरून काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं

चंद्रकांत फुंदे, (प्रतिनिधी)

पुणे, 29 जुलै- विधानसभेला तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडेल, या आशेवर हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना मोठं लीड मिळवून दिलंय. पण तरीही शरद पवारांनी त्याच हर्षवर्धन पाटलांना अजूनही गॅसवर ठेवणंच पसंत केलंय. निवडून आलेले आमदार हेच आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र राहणार असल्याचं पवारांनी म्हटलंय. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं दिसताहेत..

हेही वाचा...राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबेना.. नांदेडच्या जिल्हाध्यक्षाची सोडचिठ्ठी

पवारांचा नवा 'गुगली'काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील पुन्हा गॅसवर?

इंदापूरच्या जागेवरून राष्ट्रवादी पुन्हा कात्रजचा घाट दाखवणार म्हणून लोकसभेतच हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत करताना हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्यावर संपूर्ण पवार कुटुंबियांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेऊन त्यांची मनधरणीही घेतली होती. तेव्हा कुठे हर्षवर्धन पाटील आघाडीचा धर्म पाळायला तयार झाले आणि इंदापुरातून सुप्रिया सुळेंना भरघोस मतदान झालं. पण हा झाला इतिहास...कारण विधानसभा येताच...राष्ट्रवादीने याच इंदापूरच्या जागेवर पुन्हा हक्क दाखवायला सुरूवात केलीय. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या जागेवर पुन्हा दावा केलाय. शरद पवारांनी त्याही पुढे जात एक नवाच गुगली टाकलाय.

Loading...

हेही वाचा... मनसेने आघाडीत येण्यापेक्षा विधानसभा स्वतंत्र लढवावी, NCPच्या नेत्यांचा सूर

सन 2014 साली निवडून आलेला आमदार हेच आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र राहीलं असं, पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादीची ही अशी ताठर भूमिका लक्षात येताच हर्षवर्धन पाटलांनी लागलीच त्यांना 'आघाडी धर्माची' आठवण करून दिलीय. एवढंच नाहीतर काही झालं तरी आपण इंदापूर विधानसभा लढणारच असा दृढ निश्चयही पवार यांनी पुन्हा बोलून दाखवलाय.

इंदापूरची जागा मीच लढणार असं हर्षवर्धन पाटील कितीही म्हणत असले तरी ते नेमक्या कोणत्या पक्षाकडून लढणार हे सर्वश्री पवारांच्याच हाती असणार आहे... कारण राष्ट्रवादीने जागा सोडली तरच ते काँग्रेसतर्फे लढू शकणार आहेत. अन्यथा त्यांना एकतर अपक्ष लढावं लागेल किंवा भाजपचा रस्ता धरावा लागेल...कदाचित म्हणूनच हर्षवर्धन पाटलांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची सहकुटुंबं भेट घेतली असावी. अर्थात त्यासाठी पुस्तक प्रकाशनाचं निमित्त पुढे केलं हा भाग वेगळा...पण तुर्तास तरी पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गॅसवरच ठेवलंय हे मात्र, तितकंच खरं...

VIDEO: पुण्यात जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...