शरद पवार रमले 'पुस्तकांच्या गावात'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवारी) भिलार या "पुस्तकांच्या गावाला' भेट दिली. काही काळ तेथील पुस्तकांत ते रमले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 6, 2017 06:43 PM IST

शरद पवार रमले 'पुस्तकांच्या गावात'

06 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवारी) भिलार या "पुस्तकांच्या गावाला' भेट दिली. काही काळ तेथील पुस्तकांत ते रमले.

शरद पवार खासगी दौऱ्यानिमित्त महाबळेश्‍वर मुक्कामी आहेत. यावेळी त्यांनी पुस्तकांचे गाव भिलार येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी सरपंच वंदना भिलारे आणि माजी आमदार, स्वातंत्र्यसैनीक भि. दा. भिलारे (गुरुजी) यांच्या पुस्तकांच्या घरांना भेट दिली. साहित्याचा प्रकार, पुस्तकांची संख्या याचबरोबर पुस्तके कशा पद्धतीने निवडली, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. मोठ्या कुतूहलाने पुस्तके हाताळली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पुतणी  विजया पाटील, डॉ. रजनी इंदूलकर, स्नुषा सुनेत्रा पवार, निकोला पवार, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...