भाजपला सत्तेपासून दुर ठेवायचं असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावं-शरद पवार

2019च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आघाडीसाठी हात पुढे केलाय असं म्हटलं तर आता चुकीचं ठरणार नाही.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2018 05:43 PM IST

भाजपला  सत्तेपासून दुर ठेवायचं  असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावं-शरद पवार

29 एप्रिल:  भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रित लढलं पाहिजे असं  शरद पवारांनी  सांगितलं आहे. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.

2019च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शरद पवार यांनी आघाडीसाठी हात पुढे केलाय असं म्हटलं तर  आता चुकीचं ठरणार नाही. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अनेक गोष्टींचा परामर्श केला.  कठुआ बलात्काराच्या घटनेवरून भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना शरद पवार बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करायला विसरले नाहीत.

अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक आणि खजिनदारपदी हेमंत टकले यांची नियु्क्ती करण्यात आलीय. शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड केल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीच्या बैठकीत या नवीन नियुक्त्यासंदर्भात, पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी प्रस्ताव मांडले आणि त्याला बिनविरोध मंजुरीही मिळाली. सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांची नावं चर्चेत होती. मात्र बाजी मारली ती जयंत पाटलांनीच. 2014 मधल्या मोठ्या पराभवानंतर आणि 2019च्या निवडणुकांच्या तोंडावर, राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्याचं आव्हान जयंत पाटलांसमोर असणार आहे.

अजित पवारांची भाषणाची शैलीच मुळी अशी आहे की ते टोमणा मारतात की स्तुती करतात ते सहजासहजी कळत नाही.  आजही भाषणादरम्यान अजित पवार यांनी जयंत पाटलांची स्तुती करताना रोहीत शर्माची उपमा दिली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये रोहीत शर्माला 6 पराभवानंतर विजयाचा सूर गवसलाय. हे लक्षात घेता अजित पवारांनी जयंत पाटलांना दिलेली रोहीत शर्माची उपमा ही स्तुती समजायची की टोमणा हे त्यांनाच विचारलं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 05:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...