मोदींनी शपथविधीला अवमान केला? शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान देत त्यांचा अवमान केला गेल्याचं बोललं जात होतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 02:13 PM IST

मोदींनी शपथविधीला अवमान केला? शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

वैभव सोनवणे, पिंपरी-चिंचवड, 6 जून : नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पण मोदींच्या या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान देत त्यांचा अवमान केला गेल्याचं बोललं जात होतं. या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'शपथविधीच्या कार्यक्रमात माझी जागा कुठे याची सचिवांनी चौकशी केली होती. तेव्हा ती पाचव्या रांगेत असल्याचं कळालं. पण नंतर परत दुसरीकडे असल्याचं सांगितलं. मला वाद वाढवायचा नाही. एकतर त्यांच्या कार्यालयात त्रुटी असावी किंवा माझ्या कार्यालयात त्रुटी असावी. आता हा विषय फार मोठा नाही तो इथेच संपवला पाहिजे,' असं म्हणत शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पवारांचं मिशन विधानसभा

शरद पवार यांनी तातडीने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार तसंच विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित आहेत. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात येईल, अशी माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळवता आलं नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनाच पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील या बैठकीत मावळमधील पराभवाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Loading...


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...