राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत? शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य

आघाडीच्या या सर्व चर्चांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भाष्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 09:39 PM IST

राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत? शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

त्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून मनसेला लोकसभा निवडणुकीत काही जागा सोडल्या जातील, असंही म्हटलं जात होतं.

अशातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

Loading...

कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी भुजबळ यांच्या सोबत त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा पंकजही उपस्थित होते.

मनसेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.

पण आता या सर्व चर्चांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भाष्य केलं आहे.

'राज ठाकरे आज जरी काही प्रश्नावर आमच्या सोबत दिसत असले तरी, ते येत्या निवडणुकीत आमच्या सोबत राहतील असे वाटत नाही,' असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांनीही मनसेबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेत आघाडीत होणार नाही, असा दावा सचिन अहिर यांनी केला आहे.

त्यामुळे मुंबईतील कोणतीही जागा मनसेला सोडण्याचा प्रश्नच नाही, असंही अहिर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली.

त्यामुळे आता भुजबळांच्या भेटीनंतर आगामी काळात मनसे महाआघाडीत सामील होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...