'अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून...', शरद पवारांच्या शेतकऱ्यांना कानपिचक्या

शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 12:01 PM IST

'अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून...', शरद पवारांच्या शेतकऱ्यांना कानपिचक्या

बारामती, 5 जून : 'अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून तुम्हाला वीजेचं बील न भरण्याची सवय लागली आहे. ती सवय आता मोडा,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी हे विधान केलं आहे.

शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्याकडून चारा छावण्यांना भेट देण्यात आली. तसंच दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

'पाऊस पडेपर्यंत नाहीतर नवा चारा तयार होईपर्यंत जनावरांसाठी चारा छावण्या चालवाव्या लागतील. याबाबत सरकार विनंती करू,' असं आश्वासन शरद पवार यांनी उपस्थितांना दिलं आहे.

दरम्यान, पाण्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापणार आहे. कारण नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल असंही महाजन म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्यासाठी सरकारने ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आता सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.


Loading...

VIDEO: गडचिरोलीत वीजेच्या टॉवरवर चढली महिला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...