आता, कुठे नेऊन ठेवला देश माझा?, शरद पवारांचा भाजपला सवाल

आता, कुठे नेऊन ठेवला देश माझा?, शरद पवारांचा भाजपला सवाल

नोटबंदी, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी यामुळे यांनाच कुठं नेऊन ठेवला देश माझा अशी विचारण्याची वेळ आलीये अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

  • Share this:

23 सप्टेंबर :  3 वर्षांपूर्वी पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करून "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" म्हणणारे सत्तेत आहेत. नोटबंदी, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी यामुळे यांनाच कुठं नेऊन ठेवला देश माझा अशी विचारण्याची वेळ आलीये अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच  लवकरच समविचारी पक्षांशी चर्चा करू असं सांगत पवारांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचे संकेत दिले.

पुण्यात पत्रकारांशी बोलतांना शरद पवारांनी भाजपसह सेना आणि राणेंच्या काँग्रेस सोडचिठ्ठीचा समाचार घेतला. 3 वेळा निवडणुकात जनतेने नापसंती व्यक्त केल्यानंतर आता सिंधुदुर्गातल्या जनतेला राणेंचा आगामी निर्णय कितपत आवडेल असं म्हणत शरद पवार यांनी राणेंच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह लावलंय.

तसंच 3 वर्षांपूर्वी पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करून "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" म्हणणारे सत्तेत आहेत. नोटबंदी, इंधन दरवाढ, वाढती  बेरोजगारी यामुळे यांनाच कुठं नेऊन ठेवला देश माझा अशी विचारण्याची वेळ आलीये असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

जनतेला पर्याय पाहिजे म्हणून मोठ्या आशेने विरोधी पक्ष काय करणार म्हणून पाहतोय. पण आता लवकरच समविचारी पक्षांशी चर्चा करू असं सांगत पवारांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचे संकेत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 07:17 PM IST

ताज्या बातम्या