24 एप्रिल : मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाही. जर पंतप्रधानांनी विरोधकांशी चर्चा केल्यास निवडणूक बिनविरोध होईल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलंय. ते सोलापुरात बोलत होते.
सोलापुरात आज शरद पवारांचा नागरी सत्कार ठेवण्यात आलाय. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं पूर्ण एकदा स्पष्ट केलं.
भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे मोदींनी विरोधकांशी चर्चा केल्यास राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध होईल असंही शरद पवार म्हणाले.
विशेष म्हणजे, डाव्या आघाडीकडून राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाच्या चर्चेला उधान आले असतानाच खुद्द शरद पवारांनीच याला पुर्णविराम दिलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा