S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी -शरद पवार

"पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीचा फटका समाजातील प्रत्येक वर्गाला भोगावा लागतोय"

Sachin Salve | Updated On: Oct 2, 2017 09:13 PM IST

इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी -शरद पवार

02 आॅक्टोबर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीचा फटका समाजातील प्रत्येक वर्गाला भोगावा लागतोय. इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला अपयश येत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या किसान मंच परिषदेत शरद पवार यांनी आज मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय.

तसंच त्यांनी नोटबंदीवरही त्यांनी भाष्य केलंय. नोटबंदीने देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली आहे, नोटबंदी झाली तेव्ही शेतकऱ्याचा कणा मोडला होता. शेतीमाल कुणी विकत घेईना. शेतीचं साहित्य विकतही घेता येत नव्हतं, असंही पवार म्हणाले.ज्या वेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होते. तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला त्याची झळ बसते असंही पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close