Elec-widget

इक्बाल कासकर प्रकरणी शरद पवारांचा थेट प्रदीप शर्मांवर निशाणा!

इक्बाल कासकर प्रकरणी शरद पवारांचा थेट प्रदीप शर्मांवर निशाणा!

ठाण्यातील राष्ट्रवादी नगरसेवकांच्या कथित 'दाऊद' कनेक्शनबाबत शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलंय. या प्रकरणात शरद पवारांनी तपास अधिकारी प्रदीश शर्मांवर थेट निशाणा साधलाय. ' जो अधिकारी सात वर्षे निलंबित होता, अशा व्यक्तीच्या सांगण्यावर किती विश्वास ठेवायचा', असा परखड सवाल करत पवारांनी प्रदीश शर्मांवर नाव न घेता थेटपणे टीका केलीय.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर : ठाण्यातील राष्ट्रवादी नगरसेवकांच्या कथित 'दाऊद' कनेक्शनबाबत शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलंय. या प्रकरणात शरद पवारांनी तपास अधिकारी प्रदीप शर्मांवर थेट निशाणा साधलाय. ' जो अधिकारी सात वर्षे निलंबित होता, अशा व्यक्तीच्या सांगण्यावर किती विश्वास ठेवायचा', असा परखड सवाल करत पवारांनी प्रदीप शर्मांवर नाव न घेता थेटपणे टीका केलीय.

ठाण्यातील एका बिल्डर खंडणी वसुली प्रकरणी पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर अटक केलीय. त्याच्या चौकशीत राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नगरसेवकांची नावं पुढे आली होती. बिल्डरला धमकावण्यात या नगरसेवकांनी इक्बाल कासकरला मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यावर, आम्ही पक्ष पातळीवर चौकशी केली असून, या आरोपात अजिबात तथ्य आढळून आलेलं नाही, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलंय. कोणी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे पण खोटनाटे आरोप करून एखाद्या व्यक्तीची पर्यायाने त्याच्या राजकीय पक्षाची प्रतिमा मलिन करणं पूर्णतः चुकीचं असल्याचं पवारांनी म्हटलंय.

1994-95सालीही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी पवारांचे दाऊद गँगशी थेट संबंध असल्याचे आरोप केले होते. पण पुढे पोलिसात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यानंतर आता दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या अटकेनंतरही ठाण्यातील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची नावं पुढे आली होती. त्यावर शरद पवारांनी हे आरोप साफ फेटाळून लावलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...