News18 Lokmat

...आणि म्हणून आम्हाला जनतेने खाली खेचलं - शरद पवार

'जनतेमुळे देशातील लोकशाही मजबूत असल्याचं सांगत नरेंद्र मोदीदेखील 1977 च्या इंदिरा सरकारप्रमाणे वागत आहेत' पवारांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 08:33 AM IST

...आणि म्हणून आम्हाला जनतेने खाली खेचलं - शरद पवार

अहमदनगर, 19 एप्रिल : '1977 साली आम्ही चूक केली. त्यामुळे आम्हाला जनतेने खाली खेचलं. नंतर दोनच वर्षांनी पुन्हा जनतेनं इंदिरा गांधी यांच्यावर विश्वास ठेवून एकहाती बहुमत दिलं.' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. या बरोबरच 'जनतेमुळे देशातील लोकशाही मजबूत असल्याचं सांगत  नरेंद्र मोदीदेखील 1977 च्या इंदिरा सरकारप्रमाणे वागत आहेत' पवारांनी म्हटलं आहे.

दक्षिण लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची कर्जत इथे सभा पार पडली. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात झालेल्या या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात आम्हाला संधी दिली आणि आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्व पुढं आणलं पाहिजे असं सांगत संग्राम जगताप यांच्या उमेदवारीच समर्थन केलं.

हेही वाचा : बापरे ! BSPऐवजी BJPला केलं मतदान, पश्चाताप झाल्यानं त्यानं स्वतःचं बोटच कापलं

शरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने महाराष्ट्रातील सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील वादावर हल्ला चढवला होता. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं होतं. कुटुंब कसे चालवायचे हे मोदींना काय माहीत असले, असा प्रश्न विचारत पवारांनी मोदींचा समाचार घेतला.

Loading...

मोदी सातत्याने म्हणत आहेत की, 'शरद पवार चांगले व्यक्ती आहेत. पण त्यांच्या घरात कलह सुरू आहे. पवारांचा पुतण्या त्यांच्या हाताबाहेर गेला. पण माझ्या घरातील प्रश्नांवर त्यांना काय करायचं आहे', असा सवाल पवारांनी विचारला. मोदींच्या टीकेवर विचार करताना माझ्या लक्षात आलं की, 'मी माझी पत्नी, मुलगी, जावई आणि नातवंडासोबत राहतो. पण त्यांना यापैकी कोणीच नाही. मोदींना दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे हे पाहण्याची काय गरज आहे. यासंदर्भात खालच्या पातळीवर यायचे नसल्यानं मी अधिक काही बोलणार नाही', असं पवारांनी स्पष्ट केलं होतं.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत काँग्रेस पक्षावर अथवा नेत्यांवर टीका करण्याऐवजी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली. या टीकेला पवारांनी उत्तर दिलं.


मोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 08:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...