S M L

पवार म्हणतात, गायीची उपयुक्ता संपल्यानंतर जर...

गाय उपयुक्त प्राणी आहे. मात्र तिची उपयुक्तता संपल्यानंतर शेतकऱ्यांवर त्याचा बोझा पडू नये म्हणून तिला मारून तीचं मास खाल्ले तर त्याला मी दोषी धरणार नाही

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 11:12 PM IST

पवार म्हणतात, गायीची उपयुक्ता संपल्यानंतर जर...

11 एप्रिल : गाय उपयुक्त प्राणी आहे. मात्र तिची उपयुक्तता संपल्यानंतर शेतकऱ्यांवर त्याचा बोझा पडू नये म्हणून तिला मारून तीचं मास खाल्ले तर त्याला मी दोषी धरणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या गोहत्या कायदा देशभर लागू करण्याच्या वक्तव्यावर नाव न घेता पवारांची टीका अप्रत्यक्ष टीका केलीय.

प्रत्येक वर्गाची विचारसरणी वेगवेगळी आहे. काही वर्ग गायींला माता मानतात तर काहींचे गायींबद्दल विचार वेगळे आहे. आज देशात अल्पसंख्याक, दलित, शोषीतांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. हल्ली देशात मूलभूत अधिकारांवर हल्ले होत आहेत अशी टीका पवारांनी केली.गाय उपयुक्त प्राणी आहे. मात्र तिची उपयुक्तता संपल्या नंतर शेतकऱ्यांवर त्याचा बोझा पडू नये म्हणून तिला मारून तीचं मास खाल्ले तर त्याला मी दोषी धरणार नाही असंही पवारांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 11:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close