आत्महत्या करू नका तर राज्यकर्त्यांचं जीणं हराम करा -शरद पवार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2017 09:04 PM IST

आत्महत्या करू नका तर राज्यकर्त्यांचं जीणं हराम करा -शरद पवार

04 एप्रिल : शेतकऱ्यांनो यापुढं जीव देऊ नका तर सरकारचं जिणं हराम करा अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलंय.

पनवेलमध्ये शेतकरी संघर्षयात्रेच्या समारोपात त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांची भूमिका आक्रमकपणं मांडणाऱ्या आमदारांना निलंबित करणं ही कसली लोकशाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विदर्भातून या संघर्ष यात्रा सुरू झाली. मुख्यमंत्री विदर्भातून आहेत प्रतिसाद मिळणार नाही वाटलं होतं. पण खूप मोठा प्रतिसाद मिळाला अशी माहितीही पवारांनी दिली.

तसंच भाजप कधीच दिलेली आश्वासनं पाळत नाही. घेतलेलं कर्ज परत करण्याची जात म्हणजे शेतकरी...पण त्याला आपण मदत केली पाहिजे. जर दिलेली आश्वासनं पाळली नाहीत तर शेतकरी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही पवारांनी सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...