S M L

राष्ट्रवादी खरंच मनसेला सोबत घेणार आहे? पवारांनी सांगितली 'राज की बात'

राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2019 12:11 PM IST

राष्ट्रवादी खरंच मनसेला सोबत घेणार आहे? पवारांनी सांगितली 'राज की बात'

कोल्हापूर, 13 जानेवारी : राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. एकीकडे या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मनसेसोबतच्या आघाडीचं वृत्त फेटाळलं आहे.

शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेची आघाडी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच राज ठाकरेंसोबत आघाडीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही, अशी माहितीही पवार यांनी दिली आहे.

पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे


कोल्हापूर इथं पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी देशभरातील आघाडीच्या समीकरणांवरही भाष्य केलं आहे. 'राहुल गांधी यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा झाली आहे. जो पक्ष शक्तीशाली आहे त्याला महत्वाचं स्थान राज्यात मिळावं. बाकीच्यांनी दुय्यम स्थान घ्यावं ही आमची भूमिका आहे,' असं म्हणत शरद पवारांनी आघाडीच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

मोदी सरकारने दिलेल्या सवर्ण आरक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'केंद्र सरकारने सवर्णांना 10 टक्के आरक्षण दिलं आहे. पण हे आरक्षण कोर्टात टिकणार का, हा खरा प्रश्न आहे. मी काही कायदेतज्ञांशी बोललो. त्यांच्या मते हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही,' असं म्हणत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सवर्ण आरक्षणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'सरकारचं म्हणणं आहे की, आरक्षण टिकण्यासाठी त्यांनी घटनादुरूस्ती केली आहे. मात्र 50 टक्क्यांच्या वर आरक्षण टिकणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं यापूर्वीचं स्पष्ट केलं आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे,' असंही शरद पवार म्हणाले.

Loading...


VIDEO: पत्नीचा रोमँटिक डान्स व्हायरल, पतीनेच केला होता शूट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 12:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close