News18 Lokmat

पवारांनी माढाच्या आढाव्यासाठी बैठक बोलावली, समोरच झाला दोन गटात राडा

साताऱ्यातील फलटणमधील या बैठकीत पवारांसमोरच दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2019 04:28 PM IST

पवारांनी माढाच्या आढाव्यासाठी बैठक बोलावली, समोरच झाला दोन गटात राडा

सातारा, 22 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून आपल्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी घोषीत केल्यानंतर आढाव्यासाठी बैठक बोलावली. साताऱ्यातील फलटणमधील या बैठकीत पवारांसमोरच दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन गटातील वाद टोकाला गेल्याचा प्रत्यय खुद्द शरद पवारांनी अनुभवला. राष्ट्रवादीचे आमदारकीचे स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात चांगलाच वाद पेटला. या वादातून म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर येण्यास निर्णय घेतला.

त्यानंतर म्हेत्रेंनी भाषणाला सुरुवात केल्यावर गोरे यांच्या समर्थकांनी मोठा दंगा केला. या वादात पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. मात्र यावेळी शरद पवार निस्तब्धपणे वाद पाहत राहिले.

दरम्यान, फलटणमध्ये आज शरद पवारांनी प्रमुख कर्याकर्त्यांची अचानक बैठक बोलावली. या बैठकीला माढा आणि सातारा मतादारसंघातील कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. यावेळी शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील सर्व आमदारांना फलटण ला बोलावले आहे. यामध्ये उदयनराजे यांच्याबाबत असलेली नाराजी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.


Loading...

VIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...