शरद पवारांचं मिशन विधानसभा, पिंपरी-चिंचवडमध्ये बोलवली तातडीची बैठक

या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार तसंच विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 11:14 AM IST

शरद पवारांचं मिशन विधानसभा, पिंपरी-चिंचवडमध्ये बोलवली तातडीची बैठक

गोविंद वाकडे,पिंपरी चिंचवड, 6 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार तसंच विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित आहेत. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात येईल, अशी माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळवता आलं नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनाच पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील या बैठकीत मावळमधील पराभवाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं अपयश आलं. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी विधानसभेसाठी नवी रणनीती आखायची ठरवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे संकेत दिले होते.

विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षातील साचलेपण दूर करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती आहे.


Loading...

VIDEO : 'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...