प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या Sharad Pawar या फेसबुक पेजवरून लोकांशी संवाद साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 12:46 PM IST

प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर

मुंबई, 9 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या Sharad Pawar या फेसबुक पेजवरून लोकांशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच लोकांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. यावेळी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता.

'जे सत्तेत आहेत त्यांच्यावर टीका न करता ते आमच्यावर टीका करतात,' असं म्हणत शरद पवार यांनी आंबेडकरांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर सातत्याने टीका केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही सोशल मीडियाचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधला आहे.

कोणत्या मुद्द्यांवर पवारांनी केलं भाष्य?

'तुमच्या दिलेलं योगदान जनतेपर्यंत पोहचलं नाही का? तुम्ही केलेल्या कामांच मार्केटींग का केलं नाही? तुमच्यावर आरोप झाले. पण त्यावर तुम्ही कधीच खुलासा करत नाही. यामुळे संभ्रम होतो,' असा मुद्दा एका प्रेक्षकाने मांडला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मी केलेल्या कामाचा उदोउदो करण्याचं मला आवडत नाही. पण मला आता वाटतं काम केले हे सांगितलं पाहिजे. मोदींनी काही केले न केले, पण सांगण्याचे काम केले. त्याचा राजकीय लाभ घेतला. मला योग्य वाटले नाही.'

Loading...

'रोज रोज तेच नको, भाकरी फिरवा,' अशी भावना शरद पवारांसमोर एका कार्यकर्त्याने व्यक्त केली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मीही याबाबत पक्षातील लोकांसमवेत बोललो आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर नवीन पिढीला संधी देणं गरजेचं आहे. नवीन यादी येईल त्यावेळेस समजेल भाकरी फिरवलेली असेल.'

दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करून भाजपने आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्या तुलनेत या तंत्राचा प्रभावी वापर करणं विरोधकांना जमलं नाही. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळात असा फटका बसू नये म्हणून शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह सारखं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.


सत्ता काबीज करण्यासाठी आंबेडकर वापरणार 'मायावती पॅटर्न'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...