शरद पवार पुतण्याकडून क्लिन बोल्ड; PM मोदींचा घणाघाती आरोप

शरद पवार पुतण्याकडून क्लिन बोल्ड; PM मोदींचा घणाघाती आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात कोणाची हवा आहे हे कळते. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली.

  • Share this:

वर्धा, 1 एप्रिल: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात कोणाची हवा आहे हे कळते. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली. मोदींनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ वर्धा येथून केला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक टीका केली.

वाचा- '50 वर्ष काँग्रेसने एप्रिल फूल बनवलं', मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले 10 मुद्दे

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते कोणताही कृती विचार पूर्ण विचार केल्याशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. देशातील हवा कोणत्या दिशिने वाहते हे पवारांना चांगले माहित आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. इतक नव्हे तर सध्या त्यांच्या पक्षात कौटुंबिक लढाई सुरु आहे. कोणत्या मतदारसंघातून लढायचे आणि कोणत्या मतदारसंघातून लढायचे नाही हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे अनेक नेते निवडणुकीतून पळ काढत आहेत. अशातच शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीका मोदींनी केली.

हे देखील वाचा- 'काँग्रेसनं हिंदुंचा अपमान केला; नेते पळ काढून अल्पसंख्याकांची मदत घेत आहेत'

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही कुंभकर्णासारखी आहे. सत्तेत असताना घोटाळा करायचा आणि सहा-सहा महिने झोपून काढण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रवादी सत्तेत असताना शेतकऱ्यांनी धरणात पाण्याची मागणी केली तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहिती असे अशी आठवण देखील मोदींनी करुन दिली. इतक नव्हे तर मावळ येथे शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार आणि मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारातील आरोपींनी मोकळे याच लोकांनी सोडल्याचा आरोप मोदींनी केला.

पवारांचा पुतण्या राष्ट्रवादीवर कब्जा करतोय- PM मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

पवार स्वत: शेतकरी असून त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यांच्या कार्यकाळात देशात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यात सत्तेत असताना झालेल्या सिंचन घोटाळ्यामुळे विदर्भात दुष्काळ पडल्याचा आरोप मोदींनी केला.

पाहा-VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

राज्यात सत्तेत असताना सुशिल कुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला. इंग्रजांनीही कधी हिंदूंसाठी असा शब्द वापरला नाही. काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला असून त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. ही गोष्ट आता काँग्रेसच्या नेत्यांनी देखील समजली आहे. त्यामुळेच त्यांचे नेते जिथे अल्पसंख्याक मतदार जास्त आहेत तेथे निवडणूक लढवत आहेत, असा टोला त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता लगावला.


VIDEO: वर्ध्यातल्या सभेत मोदी बोलत असताना अर्ध्या खुर्च्या रिकाम्याच...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 01:51 PM IST

ताज्या बातम्या