S M L

शरद पवारांना नैराश्य आलं-चंद्रकांत पाटील

'पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांच्यावर जाहीर टिप्पणी करणे योग्य नाही. गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतत पराभव होत आहेत'

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2018 06:59 PM IST

शरद पवारांना नैराश्य आलं-चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, 11 जून : शरद पवारांना नैराश्य आले आहे आणि त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत टीका केलीये असं घणाघाती प्रत्युत्तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शरद पवार यांना दिलंय. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

आज कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला.  पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांच्यावर जाहीर टिप्पणी करणे योग्य नाही. गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतत पराभव होत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अनेक घटकांना उचवण्याचा प्रयत्न करत आहे पण ते घटक उचकत नसल्यामुळेच शरद पवारांना नैराश्य आलंय त्यामुळेच ते असे म्हणाले अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

तसंच छगन भुजबळ निर्दोष आहेत हे सिद्ध व्हायचं आहे त्यावेळी भुजबळ यांच्यावर आरोप झाले म्हणून त्यांना अटक झाली असंही पाटील म्हणाले.

राजू शेट्टींनी आपल्या मतदारसंघाची काळजी करत निवडून कसे येणार हे बघावं, कारण शिरोळ तालुक्यात भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे शेट्टी तुम्ही तुमची काळजी करा असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 06:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close