पवार कुटुंबात सारं काही आलबेल?; फेसबुकवर केला फोटो शेअर

पवार कुटुंबात सारं काही आलबेल?; फेसबुकवर केला फोटो शेअर

पवार कुटुंबानं शेअर केलेल्या फोटोचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • Share this:

बारामती, 16 मार्च : शरद पवार यांची माढा मतदारसंघातून माघार, पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे संकेत आणि त्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट यामुळे पवार कुटुंबात सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. यावर रोहित पवार यांनी आमच्यात मतभेद नाहीत. केवळ साहेबांच्या प्रेमापोटी पोस्ट लिहिल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर फेसबुकवर आणखी एक फोटो शेअर करण्यात आला असून यामध्ये रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे एकत्र दिसत आहेत. या फोटोच्या माध्यमातून आमच्या कुटुंबात सर्व काही ठिक आहे, असा संदेश तर पवार कुटुंबियांना द्यायचा नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर आता चर्चा देखील रंगली आहे.


Lok Sabha election 2019 : निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई; 80 लाखांची रोकड जप्त


काय म्हटलं होतं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये

राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.

एक कार्यकर्ता म्हणून, “साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल."


VIDEO : राज ठाकरेंची शरद पवारांसोबत जवळीक? गडकरी म्हणतात...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 11:21 AM IST

ताज्या बातम्या