S M L

निवडणुकीत जिंकू असा विश्वास शरद पवारांना नसेल - नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated On: Mar 15, 2019 07:59 AM IST

निवडणुकीत जिंकू असा विश्वास शरद पवारांना नसेल - नितीन गडकरी

नागपूर, 15 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यासहीत देशातलं राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.  नवीन पिढीला संधी देण्याच्या निर्णयामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. यावरूनच नितीन गडकरी यांनी निशाणा साधत म्हटलं की, 'शरद पवार यांना माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवल्यानंतर ती जिंकू असा विश्वास नसेल किंवा सध्या राज्यसभेची मुदत असल्यामुळे त्यांनी माघार घेतली असावी'.

'विदर्भात 10 जागा जिंकू'

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत विदर्भातील सर्व दहाच्या दहा जागा जिंकू असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तसंच, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात आणखी दोन ते तीन जिंकून आणू, असेही त्यांनी म्हटलं.


'राज ठाकरे असं का वागताहेत?'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपवार हल्लाबोल केला होता. याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, 'राज ठाकरे कालही माझे मित्र होते, आजही आहेत. पण ते असे का वागताहेत हे सांगता येत नाही'.

'एअर स्ट्राईकचं राजकारण आम्ही केलं नाही'

Loading...

तसंच एअर स्ट्राईकचे राजकारण आम्ही केले नाही आणि करणारही नाही, असंही त्यांनी यावेळेस म्हटलं. राफेल विमान असतं तर नुकतेच करण्यात आलेला एअर स्ट्राईक दुरून करता आला असता. दीडशे किलोमीटर दूर अंतरावरून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करता असता.

'शेतकऱ्यांसाठी मला काम करायचं आहे'

मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. ज्या दिवशी विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होईल, अशी विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.


वाचा अन्य बातम्या :

पवारांच्या 'पॉवर'ला घाबरली भाजप, शिवसेनेनंही मैदान सोडलं!


Lok Sabha Election 2019: 'या' तारखेला जाहीर होणार भाजप उमेदवारांची पहिली यादी


VIDEO: 'पार्थ'विनाच राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; UNCUT पत्रकार परिषद


SPECIAL REPORT : नागपूर मतदारसंघात दोस्तीत कुस्ती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 07:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close