शरद पवार ह्रदयात आहेत म्हणणाऱ्यांचं ह्रदय तपासा; शरद पवारांचा टोला

शरद पवार ह्रदयात आहेत म्हणणाऱ्यांचं ह्रदय तपासा; शरद पवारांचा टोला

तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही, अजून कोणी जाणार असेल तर त्यांनाही शुभेच्छा

  • Share this:

सातारा 1 ऑगस्ट : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी रांग लागलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांनी हातात कमळ घेतलं. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावत तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही असं म्हटलं आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार हृदयात आहेत बोलणाऱ्यांचं हृदय तपासा, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. तसंच अजून कोणी जाणार असेल तर त्यांनाही शुभेच्छा असंही यावेळी त्यांनी म्हटलं. साताऱ्यासाठी माझ्याकडे तीन अर्ज आहेत, साताऱ्याची जागा राष्ट्रवादी राखेल याची काही चिंता नाही, असा विश्वासही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

औरंगाबादेत वर्गमित्राचा तरुणीवर बलात्कार.. म्हणाला, अश्लील फोटो FB वर व्हायरल कर

पुन्हा  राजकीय भूकंप

विधानसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक नेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडे ओढा सुरू झाला आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात निराशेचं वातावरण आहे. अशातच आता भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असून 10 ऑगस्टला काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते हाती कमळ घेणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच  पहिल्या टप्प्यानंतर 10 ऑगस्टला  भाजपमध्ये आणखी काही नेते पक्षप्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आघाडीला मात्र चांगलाच धक्का बसणार आहे.

भरधाव कार पुलावरून नदीत पडली, प्रवाहात 3 जण वाहून गेले

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शपथ

पुणे शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'युवा संवा' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी सर्व कार्यकत्यांनी खा.डॉ अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पक्षाप्रती निष्ठावान राहण्याची शपथ घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. हेच आऊटगोईंग रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून नवा फंडा अवलंबण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 'माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही,' असं म्हणत कार्यकर्त्यांनी नेहमीच राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचा निश्चय केला.

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत केला मोठा गौप्यस्फोट

'मी आज शपथ घेतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. आदरणीय श्री शरदराव पवार यांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी आहे. गेली 55 वर्षे ज्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा निर्माण केला, अशा पावरसाहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्यास मी सदैव तत्पर राहीन. माझ्या शरीरात जो पर्यंत श्वास आहे तो पर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही.जयहिंद!जय महाराष्ट्र ! जय राष्ट्रवादी !'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 06:51 PM IST

ताज्या बातम्या