भाजप सत्तेसाठी काहीही करेल, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

भाजपा सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही मार्गाला जात असून त्यांच्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2017 07:43 PM IST

भाजप सत्तेसाठी काहीही करेल, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

02 एप्रिल :  भाजपला या देशातील सत्ता हवी आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. कल्याणजवळील वरप गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी पवारांनी भाजपच्या अच्छे दिन, नोटबंदी, गोहत्या, शेतकरी कर्जमाफी आदी प्रमुख विषयांवर चौफेर तोफ डागली.

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर सामाजिक ऐक्य ठेवण्याची खबरदारी न घेतल्यास उत्तरप्रदेशसह संपूर्ण देशावर त्याचे परिणाम होण्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्रात असणाऱ्या सत्तेच्या बळावरच गोवा, मणीपूरसारख्या ठिकाणी बहुमत नसतानाही आपली सत्ता भाजपने प्रस्थापित केली. ही गोष्ट देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक असून संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्याचबरोबर, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग काढायचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले असून त्यातून नेमकी कोणाची समृध्दी होणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास हा रस्ता होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 07:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...