...म्हणून सर्वोच्च पद हुकलं- शरद पवार

नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यातल्या प्रकट मुलाखतीत पवारांनी आपलं मन मोकळं केलं.

Sonali Deshpande | Updated On: May 28, 2017 08:22 PM IST

...म्हणून सर्वोच्च पद हुकलं- शरद पवार

28 मे : काँग्रेसमध्ये असताना काही विषयांवर स्पष्ट भूमिका घेतल्यानं देशातलं सर्वोच्च पद हुकल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केलीये. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यातल्या प्रकट मुलाखतीत पवारांनी आपलं मन मोकळं केलं. आता आकड्यांचं गणित जुळत नसल्यानं आता मी सर्वोच्चपदाचा विचार सोडून दिल्याचं पवार यांनी म्हटलंय.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर मुलाखतीचे आयोजन नाशिकला करण्यात आलं. राज्यातील आमदारकीपासून केंद्रीय कृषिमंत्रीपदापर्यंत झेप घेतलेल्या शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होतयेत. या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीचा प्रवास उलगडला गेला.अंबरीश मिश्र, दत्ता बाळ सराफ आणि सुधीर गाडगीळ यांनी  शरद पवारांची मुलाखत घेतली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, विधानसभाचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, आयोजक विश्वास पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते.

राजकारणात कितीही मतभेद असले तरी व्यक्तिगत जीवनात सलोखा जपलं पाहिजे. मी नागपूरला नितीन गडकरींच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाला गेलो आणि भाषणही केलं. राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे असं शरद पवारांनी मुलाखतीत म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2017 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close