'भागवतांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या'; शरद पवारांची मोहन भागवतांवर टिका

एका शेतकरी मेळाव्यात पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत, हिरे व्यापारी निरव मोदी, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 18, 2018 09:23 AM IST

'भागवतांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या'; शरद पवारांची मोहन भागवतांवर टिका

18 फेब्रुवारी : बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या फटकेबाजीची. पंढरपूरमध्ये आयोजित केलेल्या एका शेतकरी मेळाव्यात पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत, हिरे व्यापारी निरव मोदी, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक तीन दिवसात सीमेचं रक्षण करायला सज्ज होतील. या मोहन भागवतांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, 'माझी केंद्र शासन आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की, भागवत म्हणतात त्याप्रमाणे देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी भागवतांचं सैन्य काठ्याघेऊन सीमेवर पाठवूंन द्यावं म्हणजे भागवतांच्या बोलण्यात किती तथ्य आहे ते लोकांना कळेल. भागवत यांचे हे वक्तव्य देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची अप्रतिष्ठा करणारे आहे.' अशी टिपण्णी पवार यांनी केली.

पंजाब नेशनल बँकेला ११ हजार कोटीला गंडा घालणाऱ्या निरव मोदी यांचे खापर सत्ताधारी युपीएच्या डोक्यावर फोडत असल्याच्या वृत्ताचा समाचार घेताना पवार म्हणाले, 'देशातील एका जबाबदार व्यक्तीने निरव मोदी हे अशा पद्धतीने घोटाळा करीत आहेत अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाला लेखी स्वरूपात दिलेली होती मात्र ही बाब पंतप्रधान कार्यालयाने गांभीर्याने घेतली नाही. आणि देशाची लूट झाली. या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले का अशी साशंकता येते.'

भिडे आणि एकबोटे यांचे पाय धरण्यात धन्यता मानणारे लोक सत्तेत बसले असल्यानं त्यांच्यावर कितपत कारवाई होईल याबाबत शंका आहे. असंही पवार म्हणाले. त्याच बरोबर त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यानं त्यांना आत्महत्या करावीशी वाटते. असंही ते म्हणाले.

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या प्रश्नावर भाष्य करताना पवार म्हणाले कर्नाटक, राजस्थान आणि त्रिपुरा या राज्यातील निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांना अपेक्षित निकाल लागला तर निवडणूक होतील अन्यथा हे सरकार पूर्णकाळ सत्ता भोगेल.

आगामी निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित लढणार का या प्रश्नावर पवार बोलले, या विषयाच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये चर्चा सुरु आहे आणि आमचा प्रयन्त आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 08:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close