News18 Lokmat

'आमच्या घरात डोकावू नका, आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल'

'आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल' असा इशारा पवारांनी मोदींना जाहीर सभेत दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 09:27 AM IST

'आमच्या घरात डोकावू नका, आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल'

बीड, 14 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे बजरंग सोनवणे यांचा प्रचारार्थ आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये जाहीर झाली. या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'आमच्या घरात डोकावू नका. आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल' असा इशारा पवारांनी मोदींना जाहीर सभेत दिला आहे.

'मोदीं माझ्या कुटुंबाची काळजी म्हणे... सगळं पुतण्या चालवतो. पवारांची अवस्था गंभीर आहे. त्यांचं घरात कोणी ऐकत नाही. माझ्या घरची चिंता त्यांना. आम्ही सगळे एका जिवाभावाने वागतो. पण मोदीजी दुसऱ्याच्या घरात डोकावणं, हे वागणं बर नव्हं.' अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली.

'इथे-तिथे तोंड घालू नका. काय दिसले याचा भरोसा नाही' असंही ते पुढे म्हणाले. 'पुलवामा हल्ल्यात सैनिकांनी बदल घेतला. त्यावेळी सैनिक "अभिनंदन" पाकिस्तानमध्ये होता. त्यांची सुटका जागतिक दाबामुळे झाली. तेच मोदी म्हणतात छप्पन इंच छातीमुळे परत आणलं. मोदींनी स्वतःची पाठ थोटायचं काही कारण नाही आणि खरचं छप्पन इंच छाती असेल तर पाकिस्तानच्या तुरुंगातील अधिकारी कुलभूषण जाधव यांची सुटका करा आणि नंतर छप्पन इंचची छाती दाखवा' असा सल्लाच पवारांनी मोदींना दिला.

तसंच मोदी भाषणात गांधी आणि नेहरू कुटुंबावर टीका करत आहेत. काय केलं त्यांनी मला त्यांना सांगायचं. नेहरू, गांधी कुटुंबच देशासाठी खूप मोठा त्याग आणि मोठं योगदान आहे. देशाचे नागरिक म्हणून तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे. असं सांगता सरकारने मराठा, धनगर, मुस्लिम समाजाची फसवणूक केली' आल्याचं ही पवार यांनी सांगितलं. तसंच बीडचा विकास करण्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडणून द्या असं आव्हान त्यांनी केलं.

VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...