News18 Lokmat

शरद पवार म्हणाले, ..म्हणून वाढल्या शेतक-यांच्या आत्महत्या, सामूहिक शक्तीच चमत्कार करु शकते

शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून कांद्याचे दर पडलेत. उत्पादनाच्या दरात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरलंय. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना घामाची किंमत मिळायला हवी.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 02:45 PM IST

शरद पवार म्हणाले, ..म्हणून वाढल्या शेतक-यांच्या आत्महत्या, सामूहिक शक्तीच चमत्कार करु शकते

सय्यद पिंप्री (नाशिक), 11 एप्रिल- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  शेतक-यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप सरकारवर तिव्र शब्दात निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजीबात आस्था नाही. कांदा महागला तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मागच्या सरकारमध्ये कांदा महागला म्हणून भाजपनं आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.  शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती या निवडणुकीत चमत्कार करु शकते, असा विश्वास पवारांनी सभेत व्यक्त केला.

भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील आता आघाडीच्या पोस्टरवरुनही गायब

सय्यद पिंप्री येथील आघाडीची प्रचारसभेला शरद पवार यांनी संबोधित केले. व्यासपीठावर छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, मनसे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, डी. पी. त्रिपाठी यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून कांद्याचे दर पडलेत. उत्पादनाच्या दरात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरलंय. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना घामाची किंमत मिळायला हवी. गहू आणि तांदूळसह सर्व शेतीमाल उत्पादनात मोदी सरकारनं आघाडी सरकारच्या तुलनेत अत्यल्प वाढ केली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ केल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे.


Loading...

VIDEO : सुजय विखेंबद्दल शरद पवारांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...